22.5 C
Panjim
Saturday, November 27, 2021

ड्रग्ज घेणारे पर्यटक नकोत ः पर्यटनमंत्री

गोव्याला श्रीमंत पर्यटक हवे आहेत, ड्रग्ज घेऊन गोंधळ घालणारे किंवा बसमध्ये बसवून जेवण बनवणारे नको, असे पर्यटनमंत्री मनोहर आजगावकर यांनी सांगितले. आम्हाला ड्रग्ज घेणारे, गोव्याची नासधूस करणारे पर्यटक नकोत. आम्हाला गोव्यात श्रीमंत पर्यटक हवेत. आम्हाला आमच्या संस्कृती, वारसा आणि गोव्याचा आदर करणारे पर्यटक हवेत. आम्ही सर्वच पर्यटकांचे राज्यात स्वागत करतो, परंतु त्यांनी संस्कृती आणि परंपरेच्या मर्यादा जपून गोव्याचा आनंद घ्यावा, असे आवाहन यावेळी आजगावकर यांनी केले.

अलिकडे गोव्यात बसने पर्यटनाला जाणार्‍या पर्यटकांची संख्या वाढत आहेत. हे पर्यटक पर्यटन क्षेत्रात रस्त्यांवर अन्न शिजवतात आणि खातात. त्यामुळे राज्य सरकारने अलीकडेच सार्वजनिक ठिकाणी स्वयंपाक करण्यास बंदी घातली आहे. गोव्याच्या रस्त्यांवर जेवण बनवणे हा गुन्हा आहे. तसेच ड्रग्जचे सेवन करून राज्यात गोंधळ घालणार्‍या पर्यटकांना सहन केले जाणार नाही, असा इशारा मंत्री आजगावकर यांनी दिला.

पाच लाख पर्यटकांना मोफत व्हिसा
पाच लाख आंतरराष्ट्रीय पर्यटकांना मोफत व्हिसा देण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला आहे. पंतप्रधानांच्या या निर्णयामुळे गोव्याला फायदा होईल. राज्यातील पर्यटन आता खुले होणार आहे. येत्या काळात चार्टर फ्लाईट्स सुरू होतील. आम्ही आधीच शॅक आणि हॉटेल परवान्यांशी संबंधित ५० टक्के शुल्क माफ केले असल्याचेही यावेळी मंत्री आजगावकर यांनी सांगितले.

STAY CONNECTED

847FansLike
8,000SubscribersSubscribe

TOP STORIES TODAY

- Advertisement -

ALSO IN THIS SECTION