डोनी पोलो विमानतळाचे इटानगर येथे उद्घाटन

0
11

अरुणाचल प्रदेशातील पहिल्या ग्रीनफिल्ड विमानतळ ‘डोनी पोलो एअरपोर्ट, इटानगर’चे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते काल उद्घाटन करण्यात आले.

या विमानतळाची पायाभरणी खुद्द पंतप्रधान मोदी यांनी फेब्रुवारी २०१९ मध्ये केली होती. दरम्यानच्या काळात कोरोना महामारीसारखी मोठी आव्हाने असतानादेखील विमानतळाचे काम अल्पावधीतच पूर्ण झाले आहे. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी, ज्या ज्या माध्यमातून हे सरकार ज्या प्रकल्पांची पायाभरणी करते, त्यांचे उद्घाटनही हे सरकार करत आहे. डोनी पोलो विमानतळ हे अरुणाचल प्रदेशसाठी चौथे कार्यरत विमानतळ असेल, ज्यामुळे ईशान्य प्रदेशातील एकूण विमानतळांची संख्या १६ वर गेली आहे.

१९४७ ते २०१४ पर्यंत, ईशान्य भागात फक्त ९ विमानतळ बांधले गेले तर गेल्या आठ वर्षांच्या ईशान्येत ७ विमानतळे बांधल्याचे सांगितले.