Home बातम्या डोंगरी-मंडूरमध्ये मानशीजवळ आढळले अर्भकाचे दोन पाय

डोंगरी-मंडूरमध्ये मानशीजवळ आढळले अर्भकाचे दोन पाय

0

डोंगरी – मंडूर येथे मानशीजवळ एका अर्भकाचे दोन पाय आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी आगशी पोलिसांनी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली आहे. डोंगरी – मंडूर येथे मानशीच्या परिसरात शनिवारी संध्याकाळी 7च्या सुमारास अर्भकाचे दोन पाय आढळून आले. अर्भकाचे दोन्ही पाय जनावराने खाल्ले आहेत. त्या ठिकाणी अर्भकाच्या शरीराचे अन्य अवयव आढळून आलेले नाहीत. याबाबत आगशी पोलिसांना माहिती देण्यात आल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन अर्भकाचे दोन पाय ताब्यात घेतले. अर्भकाचे केवळ दोन पाय सापडले आहेत. एखादे पुरण्यात आलेले अर्भक जनावराने खड्यातून बाहेर काढून त्याचे पाय मानशीच्या ठिकाणी आणून टाकल्याचा कयास व्यक्त केला जात आहे. या प्रकरणी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक नेहंदा तावारीस तपास करीत आहेत.