Home बातम्या डॉ. शिवानंद बांदेकर यांच्यावरील निलंबन मागे

डॉ. शिवानंद बांदेकर यांच्यावरील निलंबन मागे

0

बांबोळीच्या गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळाच्या अस्थिरोग विभागाचे प्रमुख डॉ. शिवानंद बांदेकर यांचे निलंबन एका आदेशान्वये मागे घेण्यात आले आहे. डॉ. बांदेकर काल कामावर रूजू झाले. गेल्या २४ एप्रिल रोजी डॉ. बांदेकर यांच्या निलंबनाचा आदेश जारी झाला होता.

नंतर शिस्तपालन कृती समितीने त्यांच्यावरील निलंबन उठविण्याचा निर्णय घेतला व दक्षता खात्याचे संचालक अमरसेन राणे यांच्या सहीने ७ ऑक्टोबर रोजी निलंबन मागे घेणारा आदेश जारी करण्यात आला.