Home बातम्या डॉ. माशेलकरांना घटक राज्य दिनी ‘गोमंत विभूषण’

डॉ. माशेलकरांना घटक राज्य दिनी ‘गोमंत विभूषण’

0

आपल्या असाधारण कार्याद्वारे अनेक गोमंतकीय विविध क्षेत्रात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर नावलौकिक संपादन करतात. अशा अग्रणी गोमंतकीयांच्या कार्याच्या सन्मानार्थ, राज्य शासन कला आणि संस्कृती खात्यामार्फत त्यांना राज्याच्या सर्वोच्च अशा गोमंत विभूषण पुरस्काराने दरवर्षी सन्मानीत करते. डॉ. माशेलकर यांनी विज्ञान क्षेत्रात आंतरराष्ट्रीय स्तरावर केलेल्या महत्त्वपूर्ण कार्याबद्दल या भूमीपुत्राला गोमंत विभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

गोमंत विभूषण सन्मान प्रसंगी राज्य कला आणि संस्कृती संचालनालयामार्फत दुपारी ३.१५ वाजता हॉटेल विवांता (ताज), पणजी ते कला अकादमी दरम्यान मिरवणूक काढण्यात येईल. त्यानंतर कला अकादमीत विशेष कार्यक्रम होणार आहे. त्यात सुरवातीला डॉ. माशेलकर यांच्या जीवनपटावरील लघुपटाचे प्रदर्शन होईल. .१५ वाजता डॉ. अजय वैद्य, डॉ. माशेलकर यांची त्यांच्या कुटुंबियांसह मुलाखत घेतील. त्यानंतर संध्याकाळी ५.३० वाजता गोव्याचे राज्यपाल महोदय भारतवीर वांच्छु यांच्या हस्ते डॉ. माशेलकर यांना गोमंत विभूषण प्रदान करून सन्मानीत करतील. या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर असतील.

कला आणि संस्कृती मंत्री दयानंद मांद्रेकर सन्माननीय पाहुणे म्हणून तर मुख्य सचिव बी. विजयन तसेच कलासंस्कृती सचिव पी. कृष्णमूर्ती खास निमंत्रित पाहुणे म्हणून या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत.