डॉम्निक डिसोझा याला कर भरण्यासाठी नोटीस

0
9

शिवोली येथील फायव्ह पिलर्स चर्चच्या डॉम्निक डिसोझा याला अलिशान कारगाडीसाठी ६ लाख ०३ हजार ५५९ रुपयांचे शुल्क एका आठवड्यात भरण्याची डिमांड नोटीस म्हापसा येथील साहाय्यक वाहतूक संचालकांनी बजावली आहे. डॉम्निक डिसोझा याला अलिशान कारगाडीवर देण्यात आलेली शुल्क सूट मागे घेण्यात आल्यानंतर शुल्क भरण्यासाठी डिमांड नोटीस पाठविण्यात आली आहे. नोटीस प्राप्त झाल्यानंतर एका आठवड्यात शुल्काचा भरणा करण्याची सूचना करण्यात आली आहे. शुल्काचा भरणा न केल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.