डॉक्टर निलंबन प्रकरणाचा आयएमएकडून निषेध

0
145

भारतीय वैद्यकीय संघटनेच्या गोवा शाखेने (आयएमए) गोवा वैद्यकीय महाविद्यालयातील एका डॉक्टराच्या निलंबनप्रकरणाचा निषेध केला असून या प्रकरणी जलद गतीने चौकशी करून सत्य उघड करावे, असे आवाहन गोवा शाखेचे अध्यक्ष डॉ. एस. सॅम्युएल यांनी केले आहे.

पेडणेचे माजी आमदार जितेंद्र देशप्रभू मृत्युप्रकरणाच्या चौकशीसाठी गोमेकॉतील एका ज्येष्ठ निवासी डॉक्टराला निलंबित करण्यात आले आहे. गोमेकॉच्या निवासी डॉक्टर संघटनेने या निलंबनाबाबत नाराजी व्यक्त करून या प्रकरणी पूर्ण तपास होईपर्यंत निलंबन स्थगित ठेवण्याची मागणी केलेली आहे. मेडिसीन, रेडियोलॉजी या प्रमुख विभागातील डॉक्टर सेवा बजावत असताना डॉक्टराचे निलंबन अयोग्य आहे.