Home बातम्या ‘डॅक्स्ट्रोप्रोपोक्षीफेन’ औषधावर बंदी

‘डॅक्स्ट्रोप्रोपोक्षीफेन’ औषधावर बंदी

0

भारत सरकारने औषधे आणि प्रसाधने कायद्याच्या २६-अ कलमाखाली जारी केलेल्या परिपत्रकाद्वारे ‘डॅक्स्ट्रोप्रोपोक्षीफेन’ या औषधाचा उपचार करण्यासाठीच्या वापरावर बंदी घालण्यात आली असल्याचे गोवा अन्न आणि औषध प्रशासनाचे संचालक सलीम वेलजी यांनी सर्व औषधालये व इस्पितळांना वरील औषधांचा वापर ताबडतोब बंद करण्याचा आदेश दिला आहे.

वरील औषधांचा अन्य कोणत्याही औषधात वापरण्यास बंदी घालण्यात आली आहे. संबंधितांनी या औषधाचा साठा संबंधित कारखाने किंवा पुरवठादारांना परत करण्याचे आवाहन वेलजी यांनी केले आहे.