डिसोझांच्या निवासस्थानी आमदारांची बैठक

0
102

उपमुख्यमंत्री ऍड. फ्रान्सिस डिसोझा हे लंडनहून आपल्या म्हापसा येथील निवासस्थानी आल्याची माहिती मिळताच थिवीचे आमदार किरण कांदोळकर, हळदोणेचे आमदार ग्लेन टिकलो, कळंगुटचे आमदार मायकल लोबो, सांतआंद्रेचे आमदार विष्णू वाघ, वास्कोचे आमदार कार्लुस आल्मेदा यांनी त्यांची भेट घेऊन मुख्यमंत्री होण्यासाठी त्यांनी ऍड. डिसोझा यांना आपला पाठिंबा दर्शविला. यावेळी मायकल लोबो व विष्णू वाघ यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, मुख्यमंत्री पदासाठी उपमुख्यमंत्री ऍड. फ्रान्सिस उर्फ बाबूश डिसोझा हेच योग्य असून त्यांनाच मुख्यमंत्री करण्यात यावे अशी मागणी केली.म्हापशाचे आमदार तथा उपमुख्यमंत्री ऍड. फ्रान्सिस डिसोझा यांना राज्याचे मुख्यमंत्री करण्यात येणार याचे वृत्त काल दुपारी ऍड. डिसोझा लंडनहून गोव्यात पोहोचताच वार्‍यासारखी सर्वत्र पसरल्याने म्हापशात अनेकांनी ऍड. डिसोझा हेच मुख्यमंत्री झाले पाहिजेत अशी अपेक्षा व्यक्त केली.