29.1 C
Panjim
Wednesday, October 20, 2021

‘डिटॉक्स डाएट’ म्हणजे काय?

 • वर्षा भिडे
  (आहारतज्ज्ञ)

डिटॉक्स आहाराची गरज असेल तरच आणि व्यावसायिक तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखालीच त्याचा अवलंब करा, अन्यथा ते प्रकृतीसाठी त्रासदायक ठरण्याची शक्यता आहे. ज्या व्यक्तींचे वजन वाजवीपेक्षा कमी आहे, खाण्याबद्दलच्या तक्रारी आहेत, गर्भवती, स्तनपान करणार्‍या, जुनाट आजार असलेल्या व्यक्तींनी ‘डिटॉक्स डाएट’पासून लांबच राहावे!

प्रत्येकजण ‘डिटॉक्स’ किंवा ‘क्लिन्स’ बद्दल बोलतोय. डिटॉक्स डाएटबद्दल नेहमी गैरसमजच जास्त असतात – विशेषतः आपल्या शरीरात स्वतःचीच अशी ‘डिटॉक्सिफिकेशन’ म्हणजे ‘निर्विषीकरणाची’ यंत्रणा अस्तित्वात आहे. म्हणून ही डिटॉक्सची प्रक्रिया जाणून घेऊया म्हणजे काही प्रमाणात शंका दूर होतील.

शरीर नैसर्गिकरीत्या निर्विषीकरण कसे करते? –

निर्विषीकरण ही एक अशी प्रक्रिया आहे जी आपले शरीर आपल्या आहारातील काही पौष्टीक घटकांच्या साहाय्याने दिवसभर करत असते. यामध्ये विषारी घटक बदलले जाऊन ते शरीरातून बाहेर टाकले जातात. लिव्हर म्हणजेच ‘यकृत’ हे ‘प्राथमिक डिटॉक्सिफायर’ आहे.
टॉक्सिन्सचे दोन प्रकार आहेत – १. जे नित्याच्या शारीरिक प्रक्रियांद्वारे शरीरातच तयार होतात आणि २. जे शरीराच्या बाहेरून शरीरात येतात – खाण्यातून, पिण्यातून किंवा त्वचेद्वारे शोषून घेतले जातात.
जे टॉक्सीन्स शरीरातच तयार होतात त्यामध्ये लॅक्टिक ऍसिड, युरिया आणि पोटातील सूक्ष्म जिवाणूंपासून बनलेला टाकाऊ मळ यांचा समावेश आहे. बाहेरून आत येणार्‍या टॉक्सीन्समध्ये जंतुनाशके, समुद्री पदार्थांत असलेली मर्क्युरी, प्रदूषित हवेमधील लेड (जस्त), तंबाखू उत्पादने, औषधे किंवा दारुमधील रसायने यांचा समावेश होतो.

आपण जी औषधे घेतो त्यांचे चयापचय होऊन तेसुद्धा निर्विषीकरण पद्धतीने शरीराच्या बाहेर टाकले जातात. कारण हे टॉक्सीन्स मुख्यतः मानवी आरोग्यास हानिकारक आहेत. त्यांच्यात योग्य बदल होऊन ते मूत्र, मल, उच्छ्वास किंवा घामाद्वारे बाहेर टाकले जायलाच हवेत. प्रत्येक व्यक्तीची निर्विषीकरण करण्याची क्षमता वेगळी असते आणि त्यावर वातावरण, आहार, जीवनशैली, आरोग्य स्थिती आणि जनुकीय घटकांचा प्रभाव पडतो ज्यावरून असे लक्षात येते की काहींमध्ये निर्विषीकरणासाठी जास्त साहाय्याची गरज असते. पण जेव्हा टॉक्सीनची मात्रा एखाद्याच्या शरीरात त्याच्या निर्विषीकरणाच्या क्षमतेपेक्षा जास्त वाढते, तेव्हा हे टॉक्सीन्स फॅट पेशीं, उती (सॉफ्ट टिश्यू) आणि हाडांमध्ये जमा होतात, ज्याचा वाईट परिणाम प्रकृतीवर होतो. याच तर्काचा आधार घेऊन अशा पद्धतींचा आधार घेतला जातो ज्यामुळे शरीराची निर्विषीकरण क्षमता वाढेल. पण यासाठी अधिक संशोधनाची गरज आहे.

बर्‍याच निर्विषीकरणाच्या पद्धतींमध्ये सगळ्यात जास्त प्रक्रिया केलेले अन्नपदार्थ आणि जे पदार्थ व्यक्तीच्या शरीराकरिता वावडे आहेत किंवा ती व्यक्ती त्या पदार्थासाठी अतिसंवेदनशील आहे ते आहारातून वगळण्याची पद्धत अवलंबिली जाते- जसे डेअरी उत्पादने, गहू, अंडी, शेंगदाणे आणि लाल मांस. त्यांना बहुतांश सेंद्रीय पद्धतीने वाढवलेल्या भाज्या, फळे, ग्लुटेन विरहित धान्ये, सुका मेवा, बिया आणि कमी पातळ प्रथिने यांचा वापर करण्यास सांगितले जाते.

काही सणउत्सव किंवा व्रतवैकल्यांमध्ये केला जाणारा उपवास म्हणजे निर्विषीकरणाची एक जुनी पद्धत आहे, ज्यामध्ये आतडे स्वच्छ होतात. अनेक सूक्ष्म पौष्टीक घटक शरीराला मिळतात ज्यामुळे झोपेच्या सवयी बदलतात. उपवास करतेवेळी काही पदार्थांचा आहारात समावेश करण्यामुळेही आपली नित्याच्या जेवणाच्या सवयी बदलण्यास मदत मिळते.

शरीराच्या नैसर्गिक निर्विषीकरणास साहाय्यभूत आठ मार्ग –

निर्विषीकरणास आधारभूत गोष्टी पाळण्यासाठी कडक नियोजनाची गरज नाही. फक्त खालील काही किंवा सर्व गोष्टींचे पालन केल्यास तुमच्या शरीराच्या नैसर्गिक निर्विषीकरण प्रक्रियेला मदत मिळेल.
*. स्वच्छ पाणी पिऊन सतत तृप्त रहा.

 • दिवसाला ५ ते ९ वेळा फळे आणि भाज्या सेवन करा. (यात फळांचे रस नकोत)
 • भाज्या, फळे, कडक फळे, बिया आणि संपूर्ण धान्य यांचे सेवन करून आहारात फायबरचा लाभ मिळवा ज्यामुळे पोट साफ राहील.
 • आहारात कोबीवर्गीय भाज्यांचा समावेश करा- जसे ब्रोकोली, फुलकोबी, हिरव्या पालेभाज्या, मोड आलेले कडधान्यं, आले, हळद, बोरं्, काही कडक फळे आणि ग्रीन टी. यांमुळे निर्विषीकरणाला गती मिळते.
 • योग्य प्रमाणात पातळ प्रथिनांचा समावेश करा जे ग्लुटाथिओनची पातळी राखण्यास आवश्यक आहे, जे शरीराचे मुख्य निर्विषीकरणाचे एन्झाइम आहे.
 • तुमच्या जेवणांच्या मध्ये असलेल्या रिकाम्या वेळेत जर तुम्हाला मल्टीव्हिटामिन/मल्टीमिनरल गोळ्या घेण्याची इच्छा असेल तर तुमच्या आरोग्य तज्ज्ञ आहारतज्ज्ञाचा सल्ला घ्या.
 • फुगवलेले पदार्थ जसे केफिर, दही, किमची, इडली/डोसा/ढोकळा ज्यामुळे पचन संस्था निरोगी राहील.
 • धुम्रपान करणे, दारू पिणे आणि प्रदूषित हवेत जाणे टाळा.
  डिटॉक्स आहाराची गरज असेल तरच त्याचा आहारात समावेश करा आणि व्यावसायिक तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखालीच त्याचा अवलंब करा, अन्यथा ते प्रकृतीसाठी त्रासदायक ठरण्याची शक्यता आहे. ज्या व्यक्तींचे वजन वाजवीपेक्षा कमी आहे, खाण्याबद्दलच्या तक्रारी आहेत, गर्भवती, स्तनपान करणार्‍या, जुनाट आजार असलेल्या व्यक्तींनी डिटॉक्स डाएटपासून लांबच राहावे!

STAY CONNECTED

847FansLike
8,000SubscribersSubscribe

TOP STORIES TODAY

प्रश्न खड्‌ड्यांचा

रस्त्यांना पडलेल्या खड्‌ड्यांवरून आणि नव्याने बांधकाम होत असलेल्या महामार्गांच्या दुर्दशेवरून विरोधकांनी काल राज्य विधानसभेत सरकारला घेरले. राज्यातील रस्त्यांच्या दुरवस्थेसंबंधी आम्हीही वेळोवेळी आवाज...

खराब महामार्गामुळे विधानसभेत गदारोळ

>> कंत्राटदाराला नोटीस पाठवल्याची मुख्यमंत्र्यांची माहिती पत्रादेवी ते काणकोण या सहापदरी राष्ट्रीय महामार्गाच्या निकृष्ट कामावरून काल विधानसभेत विरोधकांनी गोंधळ...

भंडारी समाजाला ओबीसीच्या कोट्यातून आरक्षण नाही

>> पालयेकर यांचा विधानसभेत आरोप ओबीसीसाठी जे आरक्षण आहे त्या कोट्यातून भंडारी समाजाला जेवढे आरक्षण मिळायला हवे तेवढे ते...

नोकरभरतीसाठी कंत्राटी कामगारांना प्राधान्य देण्याची खंवटेंची मागणी

विविध सरकारी खात्यांत नव्याने नोकरभरती करण्यापूर्वी त्या त्या खात्यांत गेल्या कित्येक वर्षांपासून कंत्राटी पद्धतीवर काम करणार्‍या कर्मचार्‍यांना अगोदर सेवेत कायम केले जावे,...

भारतात कोरोनाचे ९९ कोटी लसीकरण

>> केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची माहिती भारतात १६ जानेवारीपासून सुरू करण्यात आलेल्या लसीकरण मोहिमेने काल तब्बल ९९ कोटींचा टप्पा गाठला...

ALSO IN THIS SECTION

वेध हिवाळी पर्यटनाचे

प्रतिभा कारंजकर तोच सूर्य, तोच चंद्र, तीच धरा आणि तेच गगन. पण प्रत्येक ठिकाणची त्याची सौंदर्याची अनुभूती निराळी...

‘कॉलेजविश्व’

प्रियंवदा सिद्धार्थ मिरींगकर (१२वी, जी.व्ही.एम्स हायर सेकंडरी स्कूल, फर्मागुडी) शाळा-कॉलेज म्हणजे शिकण्यासोबत मस्तीचे दिवस. कॉलेजला जाऊन करता येणारी मजा-मस्ती...

सवलतींचा सुकाळ

शुभदा मराठे सवलत द्यायला हरकत नाही. पण ती कशा प्रकारे द्यायची याला फार महत्त्व आहे. केवळ आर्थिक मदत...

साधुसंत येती घरा…. तोचि दसरा!

अंजली आमोणकर धुमधडाक्यात नवरात्री उत्सव साजरा केल्यानंतर दहाव्या दिवशी येतो दसरा म्हणजेच विजयादशमी. दसर्‍याच्या दिवशी गावाच्या सीमा ओलांडून...

कॉलेजविश्व

बाला दत्तप्रसाद पटवर्धन(१२वी, जीव्हीएम्स हायर सेकंडरी स्कूल) नमस्कार! मी बारावीत शिकते आहे. दहावीचा फिजिकल क्लास माझा शेवटचा होता. त्यानंतर...