डिचोली भंडारी समाजाचा श्रीपाद नाईक यांना पाठिबा

0
5

भंडारी समाजाच्या समाज बांधवांनी अंतर्गत हेवेदावे विसरून भाजप उमेदवार श्रीपाद नाईक यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून समाजाच्या कल्याणासाठी त्यांना विजयी करण्यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन डिचोली तालुका भंडारी समाजाचे माजी अध्यक्ष आनंद नार्वेकर यांनी केले. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेला समितीचे पदाधिकारी पांडुरंग वांयगणकर, प्रथमेश पांढरे, सुभाष गावकर उपस्थित होते.

श्रीपाद नाईक यांना सहाव्यांदा भाजपतर्फे उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांनी ही निवडणूक आपली शेवटची निवडणूक असल्याचे जाहीर केलेले असून त्यांना विजयी करण्यासाठी समाजातील प्रत्येकाने पुढाकार घ्यावा असे नार्वेकर यांनी म्हटले आहे.
काही दिवसांपूर्वी रुद्रेश्वर देवस्थानात निर्माण झालेल्या वादानंतर भंडारी समाजातील काही जणांनी अकारण भाजप उमेदवार नाईक यांच्यावर टीका केली होती. श्रीपाद नाईक यांच्यावर केलेली टिका निरर्थक असून दुसऱ्यांना चुकीचा सल्ला देण्याचा प्रयत्न कोणी करू नये. अशा लोकांपासून भंडारी समाजातील बांधवांनी सावध राहावे, असे नार्वेकर म्हणाले.

श्रीपाद नाईक यांना निवडून आणण्यासाठी सर्वांनी समाजाचे हित लक्षात घेऊन पुढाकार घ्यावा. भाजपा उमेदवारांना मतदान करून पंतप्रदान व मुख्यमंत्र्यांचे हात बळकट करावे असे आवाहन नार्वेकर व इतर पदाधिकाऱ्यांनी केले.