डिचोलीतील दुचाकी अपघातात ३५ वर्षीय रशियन पर्यटकाचा मृत्यू

0
12

वाठादेव-डिचोली येथील झांटये महाविद्यालयाजवळ काल झालेल्या अपघातात एका ३५ वर्षीय रशियन पर्यटकाचा मृत्यू झाला. एलिया रोगोव असे सदर पर्यटकाचे नाव असून, अपघातात गंभीर जखमी झाल्याने त्याला लगेचच इस्पितळात दाखल केले; मात्र तेथे त्याचा मृत्यू झाला. दुचाकीवर मागे बसलेली एना मितींना (३१) ही किरकोळ जखमी झाली.

डिचोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काल सायंकाळी एलिया रोगोवा हा साखळीहून डिचोलीच्या दिशेने दुचाकीवरून (क्र. जीए-११-एफ-३४५४) जात असताना झांटये महाविद्यालयाजवळ हा अपघात झाला; मात्र हा अपघात नेमका कसा घडला, याची अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
एलिया रोगोव हा मोरजी-पेडणे येथरल रेड फॉक्स हॉटेलमध्ये राहत होता, तर त्याच्यासोबत असलेली एना मितींना ही रशियन महिला हरमल येथे वास्तव्यास आहे. या अपघातामुळे पर्यटक महिला अतिशय तणावात आहे. दरम्यान, पोलिसांनी संशयावरून एक ट्रक ताब्यात घेतला असून, तपास सुरू असल्याचे सांगण्यात आले.