Home बातम्या डायोसेशन शाळांत कोकणीसाठी अनुदान घेऊन इंग्रजीतून शिक्षण

डायोसेशन शाळांत कोकणीसाठी अनुदान घेऊन इंग्रजीतून शिक्षण

0

भाषा सुरक्षा मंचची तक्रार

राज्यातील डायोसेशन सोसायटीच्या शाळांमध्ये कोकणी माध्यमासाठी अनुदान घेऊन इंग्रजी माध्यमातून शिक्षण दिले जात असल्याची तक्रार भारतीय भाषा सुरक्षा मंचच्या सासष्टी शाखेने काल दक्षिण गोवा सहायक शिक्षण संचालकांकडे केली. शिष्टमंडळाचे नेतृत्व सासष्टी शाखेचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र हेगडे यांनी केले.

राज्य सरकारचे माध्यम अनुदानविषयीचे धोरण सध्या न्यायप्रविष्ट आहे मात्र तरीही इंग्रजी माध्यम सुरू केल्याचेही भाषा मंचने सहायक शिक्षण संचालकांच्या निदर्शनास आणले. शिक्षण संचालकांनी संबंधित शाळांना परिपत्रक पाठवून मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यास भाग पाडावे, यासंबंधी पाहणी करण्यासाठी शिक्षण तज्ज्ञ, समाजसेवक व शिक्षण खात्याच्या अधिकार्‍यांचा समावेश असलेली संयुक्त समिती स्थापन करावव अशी मागणीही करण्यात आली.