ठकसेन पूजा नाईकला 5 दिवसांची पोलीस कोठडी

0
3

डिचोलीतील एका इसमाकडून सरकारी नोकरीच्या आमिषाने लाखो रुपये उकळल्या प्रकरणी अटक केलेल्या पूजा नाईकला काल न्यायालयात हजर केले असता तिला 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

सविस्तर माहितीनुसार, डिचोली पोलीस स्थानकात आठ दिवसांपूर्वी एका व्यक्तीने पूजा नाईकविरुद्ध तक्रार नोंदवली होती. सरकारी नोकरी मिळवण्यासाठी सदर व्यक्तीने पूजा नाईकला 2 लाख रुपये दिले होते; मात्र तिने नोकरी मिळवून न देता फसवणूक केल्याची तक्रार सदर व्यक्तीने नोंदवली होती. गेल्या दोन वर्षांपूर्वी हा व्यवहार झाला होता. पूजाने गेल्या 2 वर्षांत त्याला नोकरी मिळवून दिली नाही, उलट पैसे परत मागितले असता ते देण्यास चालढकल केली. त्यामुळे सदर इसमाने डिचोली पोलीस स्थानकात तक्रार नोंदवली.