टेलिफोन खांब चोरणाऱ्या तिघा जणांना अटक

0
2

रेवोडा बार्देश येथे रस्त्याच्या कडेला ठेवलेला एक टेलिफोन खांब तीन संशयितांनी चोरला व तो एका जीपमध्ये ठेवून ते पळून जात असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. सदर खांबाची किंमत 10,000 आहे. खांब घेऊन पळून जात असल्याची माहिती मिळताच कोलवाळ पोलीस निरीक्षक विजय राणे त्यांच्या पथकासह कुणाल नाईक, रुपेश कोरगावकर, हवालदार अजय गावडे यांनी कारवाई करून परिसरात झडती घेतली आणि एक महिंद्रा जीपसह (जीए 03 एन 5419) अंकुश रामदास काळे, सूर्यकुमार रमेश राठोड आणि हेमंत गोविंद नाईक सर्व कर्नाटक या तीनजणांना ताब्यात घेतले. त्यांनी चोरलेला खांब जीपमध्ये इतर साहित्यासह सापडला. चोरीच्या मालमत्तेसह सर्व आरोपींना पोलीस ठाण्यात आणण्यात आले. पोलीस उपअधीक्षक यांच्या संपूर्ण देखरेखीखाली शोध आणि तपास करण्यात आला.

कोलवा येथे गांजा जप्त

कोलवा पोलिसांनी एका इसमास ताब्यात घेऊन त्याच्याकडील 121 ग्रॅम गांजा हस्तगत केला. संशयिताचे नाव ॲरन ग्रे (36) असे असून तो मूळ तेलंगणा राज्यातील आहे. कोलवा पोलिसांना सदर संशयित व्यक्तीबाबत माहिती मिळताच त्यांनी तेथे जाऊन संशयिताला ताब्यात घेतले व गांजा जप्त केला. त्याची किंमत 15 हजार रु. आहे.