टॅक्सीवाल्यांच्या मोर्चाने हक्कभंगाचा दावा

0
38

राज्यातील टॅक्सींना मीटर्स बसवण्याची मागणी विधानसभेत करताना आपण टॅक्सीवाल्यांना चोर म्हणालो नव्हतो असे सांगून टॅक्सीवाल्यानी आपल्या घरी मोर्चा आणून हक्कभंग केल्याचे अपक्ष आमदार रोहन खंवटे यांनी काल शून्य तासाला सभागृहाच्या नजरेत आणून दिल्यानंतर पर्रीकर बोलत होते.

यावेळी बोलताना सभापती राजेंद्र आर्लेकर म्हणाले की अत्यंत गंभीर बाब आहे. आमदारांना सभागृहात आपले म्हणणे मांडण्याचा पूर्ण अधिकार आहे. तसे केले म्हणून आमदारांना धमकावणे, धारेवर धरणे हे योग्य नसल्याचे ते म्हणाले. विरोधी पक्षनेते प्रतापसिंह राणे यांनी त्यांना सभागृहापुढे आणण्याची मागणी केली.

यावेळी बोलताना आमदार विष्णू वाघ म्हणाले की आम्हाला टॅक्सीवाल्यांकडून धमक्या येऊ लागल्या आहेत. आम्ही टॅक्सींना मीटर्स बसवण्याची जी मागणी केली होती ती जनतेच्या हितासाठी होती. मात्र टॅक्सीवाल्यांनी या प्रकरणी हक्कभंग केल्याचा आरोप त्यांनी केला. यावेळी सभापती म्हणाले की आपणाला अहवाल मिळाल्यानंतर तो हक्कभंग समितीपुढे ठेवला जाईल व नंतर पुढील कृती होईल.