‘टुरिस्ट टॅक्सी प्रश्‍नावर तीन महिन्यांत तोडगा’

0
2

ऍप आधारित टॅक्सी ही काळाची गरज असून, राज्यातील टुरिस्ट टॅक्सी प्रश्‍नावर आगामी तीन महिन्यांत तोडगा काढण्यात येणार आहे, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल पत्रकारांशी बोलताना सांगितले.

वर्ल्ड ट्रॅव्हल ऍण्ड टुरिझम कौन्सिल इंडियाच्या सदस्यांशी संवाद साधल्यानंतर मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी ही माहिती दिली. पर्यटकांना राज्यातील टॅक्सीच्या जादा भाड्यामुळे आर्थिक ताण सहन करावा लागत आहे. जगभरात ऍप आधारित टॅक्सी सेवा कार्यरत आहे. त्यामुळे गोवा राज्य ऍप आधारित टॅक्सीपासून वेगळा राहू शकत नाही, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. दाबोळी आणि मोपा हे राज्यातील दोन्ही विमानतळ कार्यरत राहणार आहे. गोवा विधानसभेतही दोन्ही विमानतळ कार्यरत राहतील याची ग्वाही दिलेली आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.