डॉ. टी. बी. कुन्हा हे गोवा मुक्तीसंग्रामाचे जनक आहेत. त्यामुळे संसदेच्या सभागृहात त्यांचे तैलचित्र लावावे यासाठी आपण प्रधानमंत्री डॉ. मनमोहन सिंग यांच्याकडे मागणी केल्याचे अनिवासी भारतीय आयुक्त तथा माजी केंद्रीय मंत्री एदुआर्द फालेरो यांनी काल पत्रकार परिषदेत सांगितले.
वरील सभागृहात एकाही गोमंतकीयाचे छायाचित्र नाही. गोवा मुक्तीच्या सुवर्णमहोत्सवी वर्षाच्या निमित्ताने गोव्याला शुभेच्छा व्यक्त करण्यासाठी लोकसभा व राज्यसभेत ठराव संमत करण्याची मागणी केल्याचे त्यांनी सांगितले.
गोव्याचा मुक्तीसंग्राम तसेच राज्याच्या विकासात गोव्याचे पहिले मुख्यमंत्री भाऊसाहेब बांदोडकर, तसेच डॉ. जॅक सिकेरा यांच्या बरोबरच स्वातंत्र्यसेनानी पुरुषोत्तम काकोडकर यांचेही फार मोठे योगदान आहे. त्यामुळे दि. ५ नोव्हेंबर रोजी त्यांच्या नावाने केंद्रीय मानव संसाधनमंत्री कपिल सिब्बल यांचे मडगाव येथील रवींद्र भवनात व्याख्यान आयोजित करण्याचा निर्णय घेतल्याचे फालेरो यांनी सांगितले.