टिकलोविरुद्ध अपात्रता याचिका फेटाळली

0
49

हळदोणे मतदारसंघाचे भाजप आमदार ग्लेन टिकलो हे पोर्तुगीज नागरिक असल्याचा दावा करून त्यांच्याविरुद्ध दाखल केलेली अपात्रता याचिका काल राज्यपाल भारतवीर वांछू यांनी फेटाळून लावली. ही याचिका आपल्या कार्यकक्षेत्र येत नसल्याचे राज्यपालांनी सांगितले.

भारतीय घटनेच्या कलम १९२ (१) खाली टिकला यांच्याविरुद्ध ही याचिका दाखल करण्यात आली होती.

राज्यपाल वांछू यांच्याकडे आलेली ही याचिका त्यांनी सल्ल्यासाठी भारतीय निवडणूक आयोगाकडे पाठविली होती. आयोगाने त्यासंदर्भात राज्यपालांना आपले मत कळविले होते. त्या पार्श्वभूमीवर राज्यपाल वांछू यांनी ही अपात्रता याचिका आपल्या कार्यकक्षेत येत नसल्याचे नमूद करून फेटाळली.