भाजपचे हळदोणे मतदारसंघाचे आमदार ग्लेन टिकलो हे विदेशी नागरिक असल्याने त्यांना अपात्र केले जावे, अशी मागणी करणारे एक निवेदन आपण व अमरनाथ पणजीकर यांनी राज्यपाल भारतवीर वांछू यांना दिले असल्याचे कॉंग्रेस प्रवक्ते सुदीप ताम्हणकर यांनी काल येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.
कॉंग्रेस पक्षात प्रवेश करण्यापूर्वी आपल्या पोटापाण्याची सोय मनोहर पर्रीकर हे करीत असत असा काल विल्फ्रेड मिस्किता यांनी जो आरोप केला होता तो त्यांनी खोडून काढला.

