टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांनी, आपल्या पदाचा राजीनामा जाहीर केला आहे. पुढील आठवड्यात, 18 ऑगस्ट रोजी, टाटा सन्सची वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडणार आहे, मात्र त्या आधीच चंद्रशेखरन यांनी राजीनामा दिला आहे.
चंद्रशेखरन यांचा कार्यकाळ फेब्रुवारी 2027 रोजी संपुष्टात येणार होता, पण त्याआधीच एन. चंद्रशेखरन यांनी टाटा सन्सच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला असून पुनर्नियुक्तीसाठी अर्ज करणार नसल्याचे त्यांनी सांगितले.
टाटा समूहाच्या धर्मादाय शाखा – टाटा ट्रस्ट्सचे अध्यक्ष नोएल टाटांनी चंद्रशेखरन यांच्या पुनर्नियुक्तीला विरोध दर्शवल्यानंतर टाटा सन्सने फेब्रुवारीमध्ये चंद्रशेखरन यांची अध्यक्षपदी फेरनियुक्ती करण्याबाबतचा निर्णय पुढे ढकलल्याचे सांगितले होते.
चंद्रशेखरन 1987 मध्ये टाटा समूहात रुजू झाले आणि 2009 मध्ये टीसीएसचे सीईओ व 2017 मध्ये टाटा सन्सचे अध्यक्षपदावर विराजणांन झाले. एन. चंद्रशेखरन टाटा परिवाराबाहेरील समूहाचे नेतृत्व करणारे पहिले व्यावसायिक व्यवस्थापक होते.

