वरील प्रकरणी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. टपालातून येणारी मते वेगळी ठेवण्याची मागणी त्यांनी केली आहे. पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांना बोलावून दि. १२ रोजी झालेल्या निवडणुकीचा आढावा घेतला असता, दक्षिण गोवा व उत्तर गोवा या दोन्ही जागा कॉंग्रेसलाच मिळतील याची खात्री पटल्याचे फर्नांडिस म्हणाले.
ज्या भागात मोठ्या प्रमाणावर मतदान झाले ते कॉंग्रेसच्या बाजूने होते. त्यामुळेच पर्रीकर घाबरले आहेत. टपालाद्वारे येणार्या मतांचा भाजपला फायदा व्हावा म्हणून पर्रीकर यांनी महागाई भत्ता जाहीर केल्याचा आरोप त्यांनी केला.
दाबोळीचे आमदार माविन गुदिन्हो वगळता अन्य सर्व आमदारांनी व गेल्या विधानसभा निवडणुकीतील पराभूत उमेदवारांनीही पक्षासाठी काम केल्याचे त्यांनी सांगितले. पक्षाच्या विरोधात कुणी काम केले याची माहिती मिळविली असून त्यांच्यावर योग्य वेळी कारवाई केली जाईल, असेही त्यांनी सांगितले. काल झालेल्या प्रदेश कॉंग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली. यावेळी काहीजणांनी प्रदेश कॉंग्रेस अध्यक्षांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केल्याचे कळते.

