टँकर उलटून ७ जण होरपळून मृत्युमुखी

0
50
पेट्रोलवाहू टँकर उलटून लागलेल्या आगीत सात जण होरपळून ठार झाले. मुंबई-अहमदाबाद महामार्गावर चावरी चेकपोस्टनजीक पहाटे ३ वा. हा अपघात झाला. पेट्रोलवाहू टँकर उलटला व त्याचा स्फोट होऊन आग लागली. यावेळी टँकरमधील तिघे तसेच रस्त्यावरून चालत जाणारे चार असे सात जण आगीच्या भक्ष्यस्थानी पडले व ठार झाले. अन्य काही जण जखमी झाल्याचे कळते. 

शिवाय महामार्गालगतच्या एका हॉटेलात काहीजण अडकून पडले असल्याची शक्यता आहे. टँकर मुंबईहून अहमदाबादकडे चालला होता. अपघातानंतर अग्नीशामक दलाच्या बंबांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. महामार्गावरील वाहतूक रात्री उशीरापर्यंत थांबवण्यात आली होती.