झुवारीनगर येथे कारने ठोकरल्याने दोन युवक ठार

0
202

झुवारीनगर वास्को येथे काल पहाटे साडेसहाच्या सुमारास एका चारचाकी वाहनाने धडक दिल्याने दोन युवकांचा जागीच मृत्यू झाला. झुवारीनगर येथील बिट्‌स पिलानीसमोर ही घटना घडली.
काल सोमवारी पहाटे साकवाळ झरी येथील दर्शन लमाणी (१४) व अनिल राठोड (१६) हे दोन युवक बिट्‌स पिलानीसमोर जॉगिंग करत होते. त्यावेळी वेर्णा येथून वास्कोच्या दिशेने भरधाव वेगाने जाणार्‍या आय २० कारने (केए ५१ एमएम १५०१) त्यांना पाठीमागून जोरदार धडक दिली. त्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांना त्वरित तेथील जिल्हा इस्पितळात दाखल केले होते. मात्र तेथील डॉक्टरनी त्या दोघांचाही मृत्यू झाल्याचे सांगितले. या प्रकरणी कारचालक गुरू गुगल (३६) याला वेर्णा पलिसांनी अटक केली आहे.