Home बातम्या ज्येष्ठ भाजप नेते बाळ आपटे यांचे निधन

ज्येष्ठ भाजप नेते बाळ आपटे यांचे निधन

0

भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार बाळ आपटे यांचे काल वयाच्या ७३ व्या वर्षी निधन झाले. गेले काही दिवस फुफ्फुसाच्या आजाराने ते हिंदुजा रुग्णालयात दाखल होते. मितभाषी आणि संयमी व्यक्तिमत्त्वाचे श्री. आपटे हे रा. स्व. संघ, अभाविप आदी संघटनांशी जवळून संबंधित होते.

अभाविपचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिले होते. नंतर भारतीय जनता पक्षामार्फत त्यांनी राजकारणात प्रवेश केला. भाजपाचे ते खासदारही होते.