पत्रकारितेतील ज्येष्ठ, अभ्यासू व निस्पृह व्यक्तिमत्व म्हणून परिचित असलेले सव्व्यसाची संपादक लक्ष्मणराव जोशी यांचे मंगळवारी दुपारी 2 वाजता नागपुरच्या देवनगर येथील सत्यम हॉस्पिटलमध्ये अल्पशा आजाराने निधन झाले. मृत्युसमयी त्यांचे वय 89 वर्षे होते.
पत्रकारितेतील आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीत लक्ष्मण जोशी यांनी सुरवातीला नागपूर येथील तरुण भारत या दैनिकात पत्रकार म्हणून कार्य केले. त्यानंतर काही काळ गोव्यात दैनिक गोमंतक व दैनिक गोवा दूतचे संपादक म्हणून त्यांनी कार्य केले व पुन्हा नागपूरला परतले आणि तरुण भारतमध्ये कार्यरत राहिले. पुढे त्यांनी लोकशाही वार्ता या वृत्तपत्रात संपादक म्हणून उल्लेखनीय कामगिरी बजावली.

