Home बातम्या जुवारी पुलाचे काम आचारसंहितेमुळे अडले

जुवारी पुलाचे काम आचारसंहितेमुळे अडले

0

छोट्या छोट्या भेगा पडल्याने वाहतुकीसाठी धोकादायक ठरलेल्या जुवारी पुलाच्या डागडुजीचे काम विधानसभा निवडणूक आचार संहितेमुळे अडून पडले असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम खात्यातील सूत्रांनी दिली.

जुवारी पुलाला भेगा पडल्याने तो वाहतुकीसाठी धोकादायक ठरल्याच्या पार्श्‍वभूमीवर सार्वजनिक बांधकाम खात्याने सदर पुलाची पाहणी केल्यानंतर ३० ते ४० लाख रु. खर्चून सदर पुलाच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्याचे ठरवले होते. मात्र, आता राज्यात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीसाठीची आचारसंहिता राज्य निवडणूक आयोगाने लागू केलेली असल्याने डागडुजीचे काम हाती घेता येत नसल्याचे सार्वजनिक बांधकाम खात्यातील सूत्रांनी सांगितले. राष्ट्रीय महामार्ग १७ च्या चौपदरीकरणाचे काम टोलच्या प्रश्‍नावरून अडून पडलेले असल्याने जुवारीनगर पर्यायी पूल उभारण्याचे काम अडून पडलेले असून त्यामुळे आहे तोच पूल दुरुस्त करावा लागत असल्याचे सूत्रानी सांगितले. सध्या मात्र आचारसंहितेमुळे डागडुजीचे काम अडून पडलेले आहे.