Home बातम्या जुवारकर कॉंग्रेसमध्ये

जुवारकर कॉंग्रेसमध्ये

0

ताळगावचे माजी आमदार व माजी मंत्री सोमनाथ जुवारकर यांनी काल कॉंग्रेस पक्षात रितसर फेरप्रवेश केला. कॉंग्रेस सदस्यत्वाचा अर्ज त्यांनी प्रदेशाध्यक्ष सुभाष शिरोडकर यांच्याकडे सुपूर्द केला. यावेळी पत्रकारांशी बोलताना सुभाष शिरोडकर म्हणाले की, सोमनाथ जुवारकर यांनी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केल्याने पक्षाची ताळगाव व पणजी मतदारसंघातील ताकद वाढली आहे.

पत्रकारांनी जुवारकर यांना कॉंग्रेस प्रवेशाविषयी विचारले असता ते म्हणाले की, कॉंग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर आपण कुठल्याही पक्षात प्रवेश केला नव्हता. उमेदवारी न मिळाल्याने आपण कॉंग्रेसचा त्याग केला होता, असे ते म्हणाले. जुवारकर यांना पणजी मतदारसंघातून उमेदवारी देणार आहात काय, असे शिरोडकर यांना विचारले असता त्यांना कुठल्याही मतदारसंघातून उमेदवारी दिली जाऊ शकते, असे ते म्हणाले. जुवारकर यांना पणजी मतदारसंघातून उमेदवारी देण्याचे आश्‍वासन दिले आहे काय, असे विचारले असता त्यांना कुठल्या मतदारसंघातून उमेदवारी द्यायची हे नंतर ठरवणार असल्याचे ते म्हणाले.