जुने गोवे बेकायदा बांधकाम, पुढील सुनावणी सप्टेंबरमध्ये

0
14

जुने गोवा येथील वारसा स्थळातील बेकायदा बंगला प्रकरणातील याचिकेवर पंचायत संचालकासमोर काल सुनावणी घेण्यात आली असून सुनावणी 9 सप्टेंबर 2025 पर्यत पुढे ढकलण्यात आली आहे. जुने गोवा येथील वारसा स्थळातील बेकायदा बंगल्याच्या विषयावर जलदगतीने सुनावणी घेऊन निवाडा द्यावा, अशी मागणी पंचायत संचालकांकडे करण्यात आली आहे, अशी माहिती सुनावणीनंतर याचिकादारांच्यावतीने ॲना ग्रासिएस यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.