जुने गोवेत अपघात; दुचाकीचालक ठार

0
20

खोर्ली-जुने गोवे येथे काल रात्री टेम्पो आणि दुचाकी यांच्यात झालेल्या अपघातात दुचाकीचालक ठार झाला. आकाश गावडे (27, रा. प्रियोळ) असे मृत चालकाचे नाव आहे. खोर्ली येथे समोरासमोर या दोन्ही वाहनांत धडक झाली. धडकेनंतर दुचाकीचालक रस्त्यावर कोसळला. गंभीर जखमी झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी टेम्पोचालक प्रदीप महातो (मूळ रा. बिहार) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.