जुने गोवेतील बेकायदा बांधकाम प्रकरणी १९ एप्रिलला सुनावणी

0
17

जुने गोवे येथील वारसा स्थळ परिसरात बेकायदेशीररित्या जे बांधकाम करण्यात आलेले आहे, त्यासंबंधी पंचायत खात्याचे अतिरिक्त संचालक उमाकांत काणकोणकर यांच्यासमोर येत्या १९ एप्रिलला सुनावणी होणार आहे. या प्रकरणी तीन हस्तक्षेप याचिका दाखल करण्यात आलेल्या असून, त्या अमित पालेकर, सेव्ह ओल्ड गोवा ऍक्शन कमिटी व स्थानिक नागरिकांनी दाखल केलेल्या आहेत. यासंबंधी प्रतिवादींचे उत्तर जाणून घेतल्यानंतर आपण या हस्तक्षेप याचिकांबाबत योग्य तो निर्णय घेणार असल्याचे काणकोणकर यांनी म्हटले आहे, तोपर्यंत बांधकाम परवाना मागे घेण्यावर स्थगिती असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.