जुनी वाहने स्क्रॅप केल्यास नवीन वाहन नोंदणीवेळी कर सवलत

0
2

वाहतूक खात्याकडून सूचना जारी; 75 हजारांपर्यंत कर सवलत शक्य

राज्य सरकारच्या वाहतूक खात्याने जुनी वाहने स्क्रॅप केल्यानंतर नवीन वाहनांसाठी नोंदणी करणाऱ्या मालकांकरिता एक नवीन कर सवलत योजना सुरू केली आहे. स्क्रॅप केलेल्या वाहनाचे प्रमाणपत्र सादर करून नोंदणी केलेल्या नवीन वाहनांसाठी ही कर सवलत लागू होणार आहे. यासंबंधीची सूचना वाहतूक खात्याचे संचालक पविमल अभिषेक (आयएएस) जारी केली आहे.

व्यावसायिक वाहतूक वाहने पहिल्या नोंदणीपासून आठ वर्षांपर्यंत कर आकारणी योग्य रकमेच्या 15 टक्के किंवा 75 हजार रूपये, जे कमी असेल ते कर सवलतीस पात्र आहेत. वाहतूक वाहनांव्यतिरिक्त इतर मोटार वाहने पंधरा वर्षांपर्यंत कर आकारणी योग्य रकमेच्या 25 टक्के किंवा 75 हजार रूपये, जे कमी असेल ते कर सवलतीस पात्र आहेत.
सर्व बीएस 1 नॉर्म वाहनांसाठी, वाहतूक आणि गैर-वाहतूक कर सवलत कर आकारणी योग्य रकमेच्या 50 टक्के किंवा 75 हजार रूपये, जे कमी असेल ते कर सवलतीस पात्र आहेत. बीएस 2 निकषांचे पालन करणारी मध्यम वस्तू, अवजड मोटार वाहने आणि मध्यम आणि अवजड प्रवासी वाहने देखील कर आकारणीच्या 50 टक्के किंवा 75 हजार रूपये, यापैकी जे कमी असेल ते सूट मिळण्यास पात्र आहेत, असे सूचनेत म्हटले आहे.