117 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच महिलेची अध्यक्षपदी निवड
गोवा चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्या (जीसीसीआय) अध्यक्षपदी प्रतिमा धोंड यांची निवड झालेली असून, या पदावर निवड झालेल्या त्या पहिल्या महिला ठरल्या आहेत. प्रतिमा धोंड यांची 2025-27 या कालावधीसाठी निवड झालेली आहे. गोवा चेंबर ऑफ कॉमर्सच्या 117 वर्षांच्या इतिहासात आतापर्यंत एकाही महिलेची या संस्थेच्या अध्यक्षपदी निवड झाली नव्हती.
प्रतिमा धोंड या 1 जुलै 2025 रोजी पदभार स्वीकारणार आहेत. सध्या धेंपो उद्योग समूहाचे चेअरमन श्रीनिवास धेंपो हे जीसीसीआयचे अध्यक्ष आहेत. जीसीसीआयच्या व्यवस्थापकीय समितीच्या सदस्यपदी निवड झालेल्या 14 सदस्यांमध्ये डॉ. संगम कुराडे, चंद्रकांत गावस, हर्षवर्धन भटकुळे, यतीन काकोडकर, पल्लवी साळगावकर, रोहन भंडारे, राजेश धेंपो, डेल मिनेझिस, रोआना मारिया कॉस्ता, सतीश शिंदे, विनेश पिकळे, प्रसाद केणी, मनोज पाटील व अत्रेय सावंत यांचा समावेश आहे.