जीवनावश्यक वस्तूंसाठी न्यायालयात धाव

0
197

राज्यात बंदच्या कालावधीत जीवनावश्यक वस्तूंसाठी त्रास सहन करावा लागत असल्याने एक याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर शुक्रवार २७ मार्चला पुढील सुनावणी होणार आहे.

राज्यातील नागरिकांना बंदच्या कालावधीत जीवनावश्यक वस्तू उपलब्ध करण्यात सरकारला यश आलेले नाही. त्यामुळे नागरिकांना विविध  त्रास सहन करावा लागत आहे, असा दावा याचिका पत्रात करण्यात आला आहे.  न्यायालयात सुनावणी दरम्यान सरकारी वकिलानी सांगितले की, जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यासाठी आराखडा तयार करण्याची प्रक्रिया सुरु आहे.