जीएसटी कौन्सिलच्या निमंत्रक पदावर मुख्यमंत्र्यांची नियुक्ती

0
7

केंद्र सरकारने रिअल इस्टेट क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी स्थापन केलेल्या जीएसटी कौन्सिलच्या मंत्रिगटाच्या निमंत्रकपदी गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या समितीवर अजित पवार (उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र), सम्राट चौधरी (उपमुख्यमंत्री, बिहार), सुरेशकुमार खन्ना (वित्तमंत्री उत्तर प्रदेश), हरपालसिंग चिमा (वित्तमंत्री पंजाब), कनुभाई देसाई (वित्तमंत्री गुजरात) आणि के. एन. बालगोपालन (वित्तमंत्री केरळ) यांची सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे.