आपने आगामी जिल्हा पंचायत निवडणूक लढविण्यासाठी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. आपच्या पणजी कार्यालयात पदाधिकाऱ्यांच्या गुरुवारी पार पडलेल्या एका बैठकीत जिल्हा पंचायत निवडणुकीवर विचारविनिमय करण्यात आला. आप जिल्हा पंचायत निवडणूक स्वबळावर लढण्यास सज्ज झाला आहे, अशी माहिती आपचे प्रदेशाध्यक्ष ॲड. अमित पालेकर यांनी बैठकीनंतर बोलताना दिली.

