जिल्हा पंचायत निवडणुकीतील प्रभाग आरक्षणाला आव्हान देणारी एक याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात दाखल करण्यात आली असून, येत्या शनिवार 15 नोव्हेंबरला या याचिकेवर सुनावणी घेतली जाणार आहे.
हणजूण जिल्हा पंचायत मतदारसंघाच्या आरक्षणाला आव्हान देण्यात आले आहे. मागील 2020 च्या निवडणुकीत हा मतदारसंघ महिलांसाठी राखीव होता. आता, 13 डिसेंबर रोजी होणाऱ्या निवडणुकीसाठी ओबीसींसाठी राखीव ठेवण्यात आला आहे. याचिकादार 2020 मध्ये निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक होता; पण मतदारसंघ महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्याने निवडणूक लढवू शकला नाही. आता डिसेंबर 2025 मध्ये होणाऱ्या निवडणुकीत पुन्हा आरक्षित करण्यात आल्याने याचिकादाराला निवडणूक लढवता येणार नाही. हा मतदारसंध पुन्हा राखीव ठेवताना नियमांचे उल्लंघन झाल्याचा दावा याचिकेत केला आहे.

