Home Featured जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी320 अर्ज वैध, 7 फेटाळले

जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी320 अर्ज वैध, 7 फेटाळले

0

आज अर्ज मागे घेण्याचा दिवस

राज्यातील जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी दाखल करण्यात आलेल्या उमेदवारी अर्जांची काल छाननी करण्यात आली. त्यावेळी 320 उमेदवारी अर्ज वैध ठरले आहेत. उत्तर गोव्यात 158 अर्ज आणि दक्षिण गोव्यात 162 अर्ज वैध ठरले आहेत.
या निवडणुकीतील उमेदवारी अर्ज गुरुवार 11 डिसेंबर 2025 रोजी दुपारी 2 वाजेपर्यंत मागे घेतले जाऊ शकतात. त्यानंतर जिल्हा पंचायत निवडणुकीचे एकंदर चित्र स्पष्ट होणार आहे.

राज्यातील जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी एकूण 327 उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते. निवडणूक अधिकाऱ्यांनी या उमेदवारी अर्जांची काल छाननी केली. त्यात 7 उमेदवारी अर्ज फेटाळण्यात आले आहेत. जिल्हा पंचायत निवडणूक पक्षीय पातळीवर घेतली जात आहे. भाजप, कॉग्रेस, आरजीपी, गोवा फॉरवर्ड, आम आदमी पार्टी यांच्याबरोबर अपक्ष उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत.