जाहीर मसुद्यातील किमान वेतन रकमेत वाढ करा : सीट

0
6

राज्य सरकारने कामगारांच्या किमान वेतनाबाबत जाहीर केलेल्या मसुद्यातील रकमेमध्ये वाढ करावी, अशी मागणी सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन्सच्या (सीटू) गोवा राज्य समितीने राज्याचे कामगार सचिव आणि कामगार आयुक्तांकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

राज्य सरकारने कामगारांच्या किमान वेतनासंबंधी मसुदा १० नोव्हेंबर २०२२ रोजी जाहीर केला आहे. गोवा राज्यातील नागरिकांचे राहणीमान आणि जीवनावश्यक वस्तूंची वाढती किंमत लक्षात घेऊन कामगारांच्या किमान वेतनात जाहीर केलेल्या मसुद्यातील रकमेपेक्षा आणखीन वाढ करण्याची गरज आहे, असे निवेदनात म्हटले आहे.

अकुशल कामगारासाठी प्रतिदिन ८०० रुपये आणि परिवर्तनशील महागाई भत्ता (व्हीडीए), अर्धकुशल कामगाराला प्रतिदिन ८७५ आणि व्हीडीए, कुशल कामगारांना प्रतिदिन ९६० रुपये आणि व्हीडीए, उच्च कुशल कामगाराला प्रतिदिन १०५० आणि व्हीडीए अशी मसुद्यात दुरुस्ती करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच, कारकुनी, सामान्य कर्मचारी, प्रशासकीय कर्मचारी यांच्या पगारामध्ये कुशल कर्मचार्‍यांच्या पगाराप्रमाणे सुधारणा करावी, अशी मागणी देखील केली आहे. समितीचे सरचिटणीस नीळकंठ फडते यांनी हे निवेदन सादर केले आहे.