राज्यभरात येत्या जानेवारीपर्यंत वाहतुकीवर देखरेख ठेवण्यासाठी एआय कॅमेरे बसविण्यात येणार आहेत, अशी माहिती वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो यांनी पत्रकारांशी बोलताना काल दिली.
राज्यात 29 ठिकाणी एआय कॅमेऱ्यांच्या माध्यमातून वाहतुकीवर देखरेख ठेवली जात आहे. राज्यात आणखी 29 ठिकाणी एआय आधारित कॅमेरे बसविण्यात येत आहेत. ज्या वाहनचालकांकडून वाहतूक नियमांचे उल्लंघन केले जाते. त्यांना दंडाचे चलन जारी केले जात आहे. एआय कॅमेऱ्यांमुळे वाहतूक उल्लंघनाच्या प्रकारात मोठी घट झाली आहे, अशी माहिती मंत्री माविन गुदिन्हो यांनी दिली.
राज्यातील वाहतुकीत शिस्त यावी या उद्देशाने एआय कॅमेरे बसविण्यात येत आहे. राज्यातील नागरिकांना दंड ठोठावण्यासाठी एआय कॅमेरे बसविण्यात येत नाही. राज्यातील अपघातप्रवण क्षेत्रामध्ये सुधारणा घडवून आणण्याचे काम सुरू आहे, असेही गुदिन्हो यांनी स्पष्ट केले.

