27.2 C
Panjim
Monday, April 19, 2021

जाणारा जात नाही रिकामा

  • मीना समुद्र

अत्यंत हळवा, कातर व्यक्तिगत अनुभव कवितेत किती सार्थपणे मांडला गेलाय. कविता उलगडत जाते तसतशी तिच्यातील शांत, संयत, सखोल जाणीव, आशयघनता आणि दृढ संकेतांना कलाटणी देणारी चिंतनशीलता असणारी ही कविता मनाला स्पर्शून जाते.

‘जाणारा जात नाही रिकामा’ या शीर्षकाची सुप्रसिद्ध लेखिका, कवयित्री आणि वक्त्या करुणा ढेरे यांची कविता परवा वाचनात आली. हा जाणारा कोण? या उत्सुकतेने कविता वाचून काढली. हा जाणारा म्हणजे कोणी घरी चार दिवस आलेला पाहुणा नव्हे; तर तो आहे प्रत्येक माणूस, पृथ्वीवर जन्माला आलेली प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक जीव.
जाणार्‍या माणसाला बरोबर काहीच नेता येत नाही-
हे खरे नाही
खरे नाही त्याचे सारे मागे ठेवणे
आणि एकट्याने निघून जाणे…
अनंताच्या यात्रेला जाणार्‍या माणसाला स्वतःबरोबर काहीच नेता येत नाही हे खरे नाही असे त्या म्हणतात. याचाच अर्थ जाणारा माणूस बरेच काही आपल्याबरोबर घेऊन जातो असे त्यांचे म्हणणे. खरं तर माणूस जन्माला आला की आई, बाबा, बहीण, भाऊ, आत्या, काका, मामा अशी सारी नाती तर त्याच्या जन्माबरोबरच त्याला चिकटतात. आणि मग पुढे जीवन जगताना मी-मी, माझं-माझं करीत तो किती नि काय काय गोळा करतो; आणखीही नाती त्याला कळतात आणि मैत्रही जुळते.

स्वतःसाठी आणि संततीसाठी घर-दार, जमीन-जुमला, बंगला-गाडी सारे काही गरजेसाठी आणि विनागरजेचेही गोळा करतो, साठवतो. कधीकाळी उपयोगी पडेल, कामी येईल म्हणत पसारा वाढवत जातो. या सार्‍या मोहपाशात अन् मायाजालात अडकलेला त्याचा जीव. कधीकधी मोहापायी त्याचा पाय त्या जंजाळातून निघत नाही, तर कधी त्या स्नेहधाग्यात, त्या प्रेमपाशात- मोहात अडकलेल्या माशीसारखे प्राण घुटमळत राहतात. पण सगळ्या गोष्टींना अखेर असतेच. प्रत्येक जन्मणार्‍या जिवाला कधी ना कधी जावेच लागते. श्‍वास संपला की सारे संपले. त्या क्षणी सारे तुटून पडते, गळून पडते आणि इथेच सारे सोडून ‘येशी उघडा, जाशी उघडा’ असेच त्याला जावे लागते. जीवन जगताना एखादाच वयोमानाप्रमाणे सगळ्याच बाबतीत हळूहळू निरवत जातो. कधी उदारमनस्कतेने सारे मिळवलेले दान करतो, वाटून टाकतो. कधी ‘हे काय मी जाताना डोक्यावरून घेऊन जाणार आहे का?’ असेही इतरांना विचारतो. तरीही आयुष्यभर धन, वस्तू, कपडे यांची जमवाजमव चालूच असते. तरी जाताना यातले काहीही त्याला बरोबर नेता येत नाही. तो अगदी रिकामा जातो अशीच आपली समजूत नव्हे तर पक्की खूणगाठ असते. मात्र ही आपली समजूत चुकीची आहे हे अरुणाताईंची कविता वाचल्यावर कळून येते. जाणारा आपली कीर्ती, आपले नावसुद्धा मागे ठेवून जातो. पण हे त्याचे मागे ठेवणे काही खरे नाही असे त्यांना वाटते. कारण जाणारा-
-जाताना आपल्या अदृश्य हातांनी
उचलतो कधी आपल्या जिवलगांची नीज
उचलतो कुणाची तरी स्वस्थता
सहज ओढून नेतो जीवनाचे दिलासे
आणि संघर्षाचे धैर्य
पायाखालच्या जमिनीचा विश्‍वासच कधी
हिरावतो कायमकरता-
अतिशय प्रिय, जिवलग व्यक्ती गेल्यावर जगणार्‍या, मागे राहिलेल्या व्यक्तीची झोप तो घेऊन जातो. त्याच्यावर भरवसा ठेवून जीवनात आपण स्थिर, स्वस्थचित्त झालेले असतो. निर्धास्तपणे तो आपली काळजी नक्कीच घेईल या खात्रीने आपण जगत असतो. त्याच्यामुळेच आपल्याला आत्मविश्‍वासाने ठामपणे कुठल्याही संघर्षाला तोंड देता येते. त्याचे पाठबळ असल्याने आपण निश्‍चिंतपणे वावरत असतो. पायाखालची जमीन जेवढी घट्ट, सावरणारी, क्षमावान तशीच ही माणसे. पण ती गेल्यावर तो त्यांच्याबद्दलचा आपल्या मनात असलेला दृढ विश्‍वासही घेऊन जातात आणि जगण्याचा ताल आणि तोलच डळमळीत होऊन जातो. तो भक्कम, आश्‍वासक आधारच नष्ट होतो. विसाव्याची जागाच नष्ट होते.

त्या जिवलग व्यक्तीच्या सहवासात मनातली सुप्त बिजे- मनातल्या भावना, कल्पना- अंकुरायच्या राहून जातात. काहीतरी उगवत असताना ते अचानक थबकतं. त्याचा श्‍वास, त्याचे अस्तित्व आणि त्याचा स्नेह हा त्या बीजाला उगवायला मदत करत असतो. जलसिंचनच जणू थांबते आणि ती ओल, ती आस, ती आच न मिळाल्याने फुलण्यासाठी आतुरलेली स्वप्ने आणि अंकुरण्यासाठी आतुरलेली बीजे जागच्या जागीच सुकून जातात. स्नेहमय, प्रेममय संबंधांची अर्थपूर्णता; त्या व्यक्तीमुळे, त्याच्या प्रोत्साहनामुळे, कौतुकाच्या नजरेमुळे मिळणारी ऊब आणि त्यामुळे निर्माण होणारी नवसृजनाची आशाही सुकून, मिटून, मालवून, विझून जाते. मुक्या बीजात संभवाची आशा असते. नवनिर्माणाची चिन्हे असतात. जन्माचे शुभशकुन असतात. हे सारे शकुन तो अनंताच्या प्रवासाला निघालेला माणूस आपल्याबरोबर घेऊन जातो.

आपली अत्यंत जिवलग व्यक्ती भेटल्यानंतर मनात येणारे विचार कवयित्री व्यक्त करते. अत्यंत प्रिय व्यक्तीच्या, जवळच्या व्यक्तीच्या जाण्याने आयुष्यात नैराश्य येते. विलक्षण पोकळी जाणवते. विशेषतः आपल्यावर प्रेम करणारी, आपले कौतुक असणारी, उत्तेजन देणारी, आधार देणारी ती व्यक्ती असेल तर हे अतिशय आतून जाणवते. माणूस अजर अमर नाही, तो कधी ना कधी जाणार हे पक्के माहीत असूनही त्याच्या नसण्याची जाणीव हताश करते. त्याच्या पावला-पावलाला येणार्‍या आठवणी, क्षणोक्षणी जाणवणारी उणीव भरून काढायला असमर्थ ठरतात. काही चुकलेले, काही करायचे, काही बोलायचे राहून गेलेले आपले काळीज चिरीत राहते. अचानक जाणार्‍या व्यक्तींबाबत तर हे जास्त प्रकर्षाने होते.

चार दिवस घरी येणारा पाहुणा परत गेला तरी आपण उदास होतो. काही दिवस आपल्याला चैन पडत नाही. ओळखीचे किंवा बिनओळखीचेही कुणी आसपास गेले तरी आपण दुःखी होतो. आपल्या माणसाचे दुःख चार अश्रू ढाळून संपत नाही. मायेच्या माणसाच्या कायमचे जाण्याच्या दुःखावर फुंकर परिणाम करू शकत नाही. आठवणींनी मन हैराण होते. आपल्याच माणसाला अजाणतेपणी दिलेल्या त्रासाने मन खंतावते. जगण्याच्या कैफात, अहंकाराने कधी कुणाची फसवणूक, सतावणूक, जाणीवपूर्वक त्रास दिलेला असेल तर मनाला सतत टोचणी लागते. संबंध जपण्यातली कडी निखळून गेल्याने त्या व्यक्तीच्या अस्तित्वाने जगण्याला येणारी अर्थपूर्णताही हरवते. वास्तवाला सामोरे जाताना, जगण्याला भिडताना हतबलता जाणवते. आता मैत्र जोडणे नको, नाती जुळवणे नको अशी हताशता सगळ्या संभवाच्या शक्यताच गोठवून टाकते. कुणी धीर दिलेला, लळा लावलेला, जीव जडवलेला असतो. अशी प्रिय व्यक्ती कायमची निघून गेल्यावर, सहवासाला पारखं झाल्यावर आठवणी उफाळून येतात.
अत्यंत हळवा, कातर व्यक्तिगत अनुभव कवितेत किती सार्थपणे मांडला गेलाय. कविता उलगडत जाते तसतशी तिच्यातील शांत, संयत, सखोल जाणीव, आशयघनता आणि दृढ संकेतांना कलाटणी देणारी चिंतनशीलता असणारी ही कविता मनाला स्पर्शून जाते.

STAY CONNECTED

849FansLike
8,000SubscribersSubscribe

TOP STORIES TODAY

चैत्रगौरी हळदीकुंकू ः निसर्गपूजा

सौ दीपा जयंत मिरींगकर(फोंडा) गौरीला माहेरपण करणे हे एक निमित्त. निसर्गातील फळाफुलापानांचे रंग, रूप, चवी अनुभवायला आणि लेकीबाळींना...

कालमापनाचे साधन ः ‘पंचांग’

सुमरंग रायसालसेत आम्ही वर्ष, महिना, वार, दिवस जसं लक्षात ठेवतो, तसं पंचांग लक्षात ठेवायला त्रास नाही. ग्रहणाची वेळच सांगते की आमचं पंचांग...

असे व्हायला नको होते, पण…

ज. अ. रेडकर(सांताक्रूझ) ‘‘कुठेही गेले तरी आता पैसे दिल्याशिवाय नोकरी मिळत नाही सर, तेव्हा माझा नाइलाज आहे, निदान...

आईची माया

प्राजक्ता गावकर ‘‘आईची मायाच तशी असते ग पोरी.’’ अपघातात आई गेली पण तिच्या मनात तुला आणि बाळाला पाहायचे...

टॅक्सीचालकांनी संप मागे घेत चर्चेसाठी पुढे यावे ः मुख्यमंत्री

राज्यातील टुरिस्ट टॅक्सीचालकांनी आपला संप मागे घेऊन चर्चेसाठी पुढे यावे, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पत्रकारांच्या एका प्रश्‍नावर बोलताना काल...

ALSO IN THIS SECTION

वाया (न)गेलेले एक वर्ष

डॉ. मधू स. गा. घोडकीरेकर नाव ‘कोविड-१९’ असले तरी या विषाणूने सन २०२० वर एकतर्फी राज्य केले. हे...

निर्णायक लढाईची वेळ

दत्ता भि. नाईक अतिशय घनदाट जंगलांत माओवाद्यांना शस्त्रे कोण पुरवतो याची कसून चौकशी झाली पाहिजे. अग्निशेष, ऋणशेष आणि...

बदलते बँकिंग क्षेत्र

शशांक मो. गुळगुळे मोबाईलने जसे मनगटावरचे घड्याळ घालविले, कॅमेरे गळ्यात घालून फिरणे घालविले तसेच ग्राहकांना बँकेपर्यंत जाण्याचा त्रास...

ऋतुराज आज वनी आला…

मीना समुद्र हा उदारात्मा वसंत चेतोहर, मनोहर असतो. त्यामुळेच त्याला ‘ऋतुराज’ ही पदवी बहाल झालेली आहे. चैत्रातले त्याचे...

दर्यादिल राजकारणी

वामन सुभा प्रभू(ज्येष्ठ पत्रकार) २२ मार्च रोजी सकाळी साडेनऊच्या सुमारास माझ्या मोबाईलवर झळकलेला हा संदेश मागील सहा-सात दिवसांत...