जसवंत सिंग यांच्याकडून अपक्ष उमेदवारी दाखल

0
85
भाजपने तिकीट नाकारलेल्या जसवंत सिंग यांनी बारमेर लोकसभा मतदारसंघातून काल अपक्ष म्हणून उमेदवारी दाखल केली.
७६ वर्षीय जसवंत यांच्याबरोबर यावेळी त्यांचे काही समर्थक उपस्थित होते. गेल्या आठवड्यात भाजपमध्ये आलेले माजी कॉंग्रेस आमदार सोनाराम चौधरी यांना बारमेरमधून उमेदवारी देण्याचा निर्णय भाजपने घेतला होता. जसवंत सिंग गेल्या लोकसभेत खासदार होते त्या दार्जिलींगमध्ये एस एस अहलूवालिया यांना भाजपने तिकीट दिले आहे.

आपण मूल्यांसाठी आणि आत्मसन्मानासाठी निवडणूक लढवत असल्याचे जसवंत यांनी सांगितले. पक्ष म्हणतो आपल्याला ऍडजस्ट करू, पण तसे करण्यासाठी आपण काही खुर्ची-टेबल नाही, असे त्यांनी परवा म्हटले होते.