जलवाहिनी फुटल्याने पर्वरीत पाणीपुरवठा ठप्प

0
70

परवा रात्री गिरी, म्हापसा येथे पर्वरी आणि कळंगुट परिसरात पाणी पुरवठा करणारी जलवाहिनी फुटल्याने पर्वरी परिसरात काल पाणी पुरवठा होऊ शकला नाही.

पाणीपुरवठा खात्याचे कार्यकारी अभियंता कमलादिनी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी गिरी येथे मोठ्या प्रमाणावर पाईप फुटल्याने ही समस्या उद्भवल्याचे सांगितले. युद्धपातळीवर काम सुरु असून आज सकाळपर्यंत सुरळीत पाणी पुरवठा होणार आहे अशी ग्वाही त्यांनी दिली.