सहलीसाठी राजस्थानच्या जयपूरहून टोंकमध्ये आलेले 11 तरुण काल बनास नदीत आंघोळीसाठी उतरले असता ते सर्व जण वाहून गेले. त्यापैकी आठ जणांचा बुडून मृत्यू झाला असून, त्यांचे मृतदेह हाती लागले आहेत. उर्वरित तिघांचा शोध अग्निशामक दल आणि बचाव दलांकडून सुरू आहे. काल दुपारी 12 च्या सुमारास ही घटना घडली.

