जम्मू काश्मीर, झारखंडमध्ये आज मतदान

0
175

जम्मू काश्मीर व झारखंड राज्यांत आज तिसर्‍या टप्प्यातील विधानसभा निवडणुका होत आहेत. दहशतवाद व नक्षलवादाचे सावट असलेल्या या राज्यांत गत दोन टप्प्यांत मोठ्या प्रमाणावर मतदान झाले होते. पुलवामा, बडगाव, बारामुल्ला या जम्मू काश्मीरातील जिल्ह्यांमध्ये निवडणुकीनिमित्त सुरक्षा फौजांच्या ४२० कंपन्या तैनात करण्यात आल्या आहेत. दरम्यान, झारखंडमध्ये काल शोधमोहिमेवेळी पोलिसांनी चार टिफिन बॉम्ब जप्त केले.