जम्मू-काश्मीरात पुरामुळे हाहाकार

0
183
मुसळधार पावसामुळे भूस्खलन होऊन जम्मू काश्मीरात कोसळलेली घरे.

घरे दरडीखाली दबून १७ ठार
गेल्या सप्टेंबरमध्ये आलेल्या जलप्रलयातून जम्मू-काश्मीर अजून सावरलेले नसताना राज्यात पुन्हा एकदा पावसाने हाहाकार माजवला असून बडगाम जिल्ह्यात ४ ते ५ घरे दरडीखाली गाडली गेली आहेत. लादेन गावातील दोन घरे दरडीखाली दबली गेल्याने १७ जण मरण पावल्याची भीती पोलीस सूत्रांनी व्यक्त केली आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मुसळधार पावसामुळे भुस्खलन होऊन लादेन गावातील दोन घरे दरडीखाली गाडली जाऊन दोन्ही कुटुंबातील १६ जण मरण पावले. या कुटुंबांचा प्रमुख लाल हाजम हे या दुर्घटनेप्रसंगी दुसर्‍या जागी असल्याने वाचले असून आतापर्यंत ढिगार्‍या खालून १० जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. दरम्यान, खोर्‍यातील अनेक भागात भूस्खलनाचे संकट ओढवले आहे. गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे झेलम नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. दरडी कोसळल्याने श्रीनगर-जम्मू महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. श्रीनगर शहरात सर्वत्र पाणी साचले असून नागरिकांना सुरक्षित स्थळी जाण्याच्या सूचना प्रशासनाने केल्या आहेत. शाळा महाविद्यालयांच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. बडगाम येथे एक पूल तुटल्यामुळे दोन हजार लोक ङ्गसले आहेत. पुंछ, राजौरी येथे अनेक भागात पाणी साचले आहे.
केंद्र सरकारकडून २०० कोटींची मदत
काश्मीरमधल्या पूरस्थितीला तोंड देण्यासाठी केंद्र सरकारने २०० कोटींची तत्काळ मदत जाहीर केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांना घटनास्थळी पाठवून पूर प्रभावित भागाचा आढावा घेण्यास सांगितले आहे. लष्कर, पोलिस आणि सीआरपीएङ्गच्या जवानांचे मदतकार्य युद्ध पातळीवर सुरू असून नागरिकांच्या बचावासाठी एनडीआरएङ्गच्या १०० जवानांसह खाद्यान्न व इतर मदतीचे सामान घेऊन हवाई दलाचे विमान श्रीनगरला रवाना झाले आहे.