26.2 C
Panjim
Sunday, July 25, 2021

जम्मू-काश्मीरातील चकमकीत चार दहशतवाद्यांचा खात्मा

जम्मू-काश्मीरमधील नगरोटा येथील बान टोल नाक्याजवळ ट्रकमधून आलेल्या दहशतवाद्यांमध्ये व जवानांमध्ये झालेल्या चकमकीत चार दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. या दहशतवाद्यांकडून मोठ्याप्रमाणात शस्त्रसाठा हस्तगत करण्यात आला आहे. जम्मू-काश्मीरमधील डीडीसी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठा दहशतवादी हल्ला घडवण्याचा त्यांचा कट असण्याची शक्यता जम्मू झोनचे आयजी मुकेश सिंह यांनी वर्तवली आहे. काल गुरूवारी पहाटे ५ वाजता जेव्हा वाहनांची नियमीत तपासणी सुरू होती. तेव्हा एका ट्रकला अडवण्यात आले. यानंतर ट्रक चालकास खाली उतरवल्यानंतर तो पसार झाला.

यानंतर ट्रकची तपासणी सुरू असताना, पोलीस व सीआरपीएफच्या जवानांवर दहशतवाद्यांकडून गोळीबार सुरू झाला. यानंतर जवानांकडून प्रत्युत्तर देण्यात आले. ही चकमक तीन तास सुरू होती. दहशतवाद्यांकडून मोठ्याप्रमाणावर जवानांवर गोळीबार केला गेला. ग्रेनेड फेकण्यात आले. ज्यामध्ये दोन पोलीस शिपाई जखमी झाले. तर, यावेळी जवानांनी चार दहशतवाद्यांना ठार केलं. यावेळी हस्तगत करण्यात आलेल्या शस्त्र साठ्यात ११ एके-४७ रायफल, तीन पिस्तुले, २९ ग्रेनेड, पिट्टू बॅग, कंपस, मोबाईलसह अन्य सामुग्रीचा समावेश होता.

STAY CONNECTED

847FansLike
8,000SubscribersSubscribe

TOP STORIES TODAY

हाहाकार

गोव्याच्या बर्‍याच भागांमध्ये पुराने काल हाहाकार माजविला. गेले काही दिवस सतत अविश्रांत कोसळणार्‍या मुसळधार पावसामुळे धरणे पूर्ण क्षमतेने भरल्याने ही वेळ ओढवणार...

राज्यात पुरामुळे हाहाकार

>> कोट्यवधी रुपयांचे नुकसान >> आज व उद्या सतर्कतेचा इशारा >> २० रेल्वे रद्द

दूधसागर येथे दरड कोसळून रेल्वेचे डबे रुळावरून घसरले

राज्यात कोसळत असलेल्या मुसळधार पावसाचा फटका रेल्वे सेवेलाही बसला. शुक्रवारी दूधसागरजवळ मोठी दुर्घटना थोडक्यात टळली. दरड कोसळल्यामुळे एका प्रवासी गाडीचे दोन डबे...

सुपाची पूड, हरवळेत ३० जणांना वाचवले

सुपाची पूड हरवळे येथील सुमारे तीन कुटूंबांतील ३० लोक दीड मीटर पाण्यात अडकून पडले होते. या सर्वांची डिचोली अग्निशामक दलाचे अधिकारी श्रीपाद...

गोपाळराव मयेकर यांना अखेरचा निरोप

गोव्याचे माजी शिक्षणमंत्री, माजी खासदार, ज्ञानेश्‍वरीचे गाढे अभ्यासक गोपाळराव मयेकर यांच्या पार्थिवावर काल शुक्रवारी म्हापसा येथील वैकुंठधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. गोपाळराव...

ALSO IN THIS SECTION

२० रेल्वेगाड्या रद्द

मुसळधार पाऊस व दरडी कोसळल्यामुळे २० रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. कोकण रेल्वेच्या १६ तर दक्षिण मध्य रेल्वेच्या ४ गाड्या रद्द...