जम्मू-काश्मीरमध्ये नवे सरकार १ मार्चला सत्तारूढ

0
89

जम्मू-काश्मीरमध्ये सत्तेची सूत्रे स्वीकारण्यासाठी पीडीपी-भाजप सज्ज झाले असून येत्या १ मार्चला नव्या सरकारचा शपथविधी होणार आहे. पीपल्स डेमॉक्रेटिक पार्टीचे प्रमुख मुफती महम्मद सईद मुख्यमंत्री होणार असल्याचे वृत्त आहे. त्यांच्या मंत्रिमंडळात पीडीपी व भाजपचे प्रत्येकी सहा मंत्री असतील अशी चर्चा आहे. सुमारे दोन महिन्यांच्या वाटाघाटींनंतर उभय पक्षांमध्ये सरकार स्थापनेचा कार्यक्रम निश्‍चित झाला आहे. भाजप नेते डॉ. निर्मल सिंदू यांची उपमुख्यमंत्री म्हणून निवड होणार असल्याचे वृत्त आहे.