जम्मू-काश्मीरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या 2 दहशतवाद्यांचा खात्मा

0
27

सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये गुरुवारी सकाळी जम्मू-काश्मीरच्या किश्तवाड जिल्ह्यातील चतरूच्या सिंहपोरा भागात चकमक झाली. यावेळी जैश-ए-मोहम्मदचे तीन ते चार दहशतवाद्यांना या भागात घेरण्यात आले, त्यापैकी दोन दहशतवाद्यांना ठार करण्यात सुरक्षा दलांना यश आले.
लष्कराच्या व्हाईट नाईट कॉर्प्सने ‘एक्स’वर पोस्ट करत या ‘ऑपरेशन ट्रॅशी’ बद्दल माहिती दिली. सिंगपोरा चतरू येथे सकाळी 7 वाजता ही चकमक सुरू झाली. यावेळी दोन पॅरा एसएफ, लष्कराच्या 11 आरआर, 7 वी आसाम रायफल्स आणि एसओजी किश्तवाड यांच्या जवानांनी शोध मोहीम सुरू केली होती. स्थानिक पोलिसांनी दिलेल्या गुप्त माहितीच्या आधारावर ही कारवाई करण्यात आली.