जम्मू – काश्मीरमध्ये चकमकीत सहा दहशतवाद्यांना कंठस्नान

0
2

जम्मू आणि काश्मीरमधील कुलगाम आणि अनंतनाग जिल्ह्यांमध्ये झालेल्या वेगवेगळ्या कारवायांमध्ये सुरक्षा दलाच्या जवानांनी सहा दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. हे दहशतवादी जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेशी संलग्न होते. बुधवारी सायंकाळी दक्षिण काश्मीरमधील दोन जिल्ह्यांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी या कारवाया सुरू झाल्या.

खात्मा करण्यात आलेल्या सहा दहशतवाद्यांपैकी चौघांची ओळख पटली आहे. यातील दोघे पाकिस्तानी असून इतर दोघे स्थानिक आहेत. इतर दोन दहशतवाद्यांची ओळख पटवण्याचे काम सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.

अनंतनागमधील चकमकीत एक पोलीस कर्मचारी जखमी झाला आहे. बुधवारी रात्री चार तर काल गुरूवारी सकाळी दोन दहशतवाद्यांना ठार करण्यात आले.